नवी दिल्ली – भारताच्या कोरोना लढ्याला पाठबळ देण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी भारताला २०० व्हेंटीलेटरची मदत करणार असल्याचे स्पष्ट केले होते. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून याबाबतची माहिती देताना त्यांनी, भारत-अमेरिका कोरोनावरील लस निर्मितीसाठी एकत्रित काम करत असल्याचेही सांगितले होते.
दरम्यान अमेरिकेने केलेल्या या मदतीसाठी आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे आभार मानले असून भारत-अमेरिकेची मैत्री अधिक दृढ झाल्याचे म्हंटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करताना, ‘अशा वैश्विक संकटावेळी जगाच्या पाठीवरील देशांनी एकत्रित येऊन लढा देणे महत्वाचे असते. आपण सर्व एकत्रितपणे कोरोना संकटावर विजय मिळवू.’ असा संदेश लिहला आहे.
Thank you @POTUS @realDonaldTrump.
This pandemic is being fought collectively by all of us. In such times, it’s always important for nations to work together and do as much as possible to make our world healthier and free from COVID-19.
More power to 🇮🇳 – 🇺🇸 friendship! https://t.co/GRrgWFhYzR
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2020