नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आज रवाना झाले. दक्षिण आफ्रिकेत, पंतप्रधान मोदी त्या देशाचे अध्यक्ष मातामेला सिरिल रामाफोसा यांच्या निमंत्रणावरून 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान जात आहेत. जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेलाही ते तेथे उपस्थित राहणार आहेत.
“ब्रिक्स विविध क्षेत्रांमध्ये मजबूत सहकार्याचा अजेंडा राबवत आहे. ब्रिक्स हे विकासाच्या अत्यावश्यकता आणि बहुपक्षीय व्यवस्थेतील सुधारणांसह संपूर्ण जागतिक मुद्द्यांवर चर्चा आणि विचारमंथन करण्यासाठीचे एक महत्वाचे व्यासपीठ बनले आहे याची आम्हाला कदर आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
ब्रिक्स हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या जागतिक अर्थव्यवस्थांचा समूह आहे.. पंतप्रधान मोदींचा हा तिसरा दक्षिण आफ्रिका दौरा असेल.
दक्षिण आफ्रिकेतून पंतप्रधान मोदी ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या निमंत्रणावरून शुक्रवारी अथेन्स दौऱ्यावर जातील. या प्राचीन भूमीला माझी ही पहिलीच भेट असेल असे मोदींनी म्हटले आहे. 40 वर्षांनंतर ग्रीसला भेट देणारा पहिला भारतीय पंतप्रधान होण्याचा मान मला मिळाला आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.