पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्याच्या दोन विस्तारित मेट्रो मार्गांचे उद्घाटन आज पार पडले. यावेळी पंतप्रधांनासोबत राज्याचे राज्यपाल,दोन्हही उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख नेते देखील उपस्थित होते.यावेळी नुकतेच सत्तेत सामील झालेले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदींचे कौतुक केले. मोदींनी नेहमीच महाराष्ट्रासह पुण्याच्या विकास कामाला साथ दिली आहे. असं अजित पवार यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते गरवारे कॉलेज ते रुबी हॉल तसेच फुगेवाडी ते शिवाजी नगर सिव्हील कोर्ट या दोन विस्तारित मार्गाचे उद्घाटन झाले. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा सुरु झाला. या दौऱ्यादरम्यान मोदींनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील महत्वाच्या कामांचे उदघाटन केले. तसेच यावेळी नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे देण्यात आली. याच घरांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य सध्या चांगलच चर्चेत आलं आहे.
“ज्या नागरिकांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते घर मिळणार आहे, त्यांनी ते घर विकण्याचा विचारही मनात आणू नये हा माझा त्यांना सल्ला आहे” असं अजित पवार म्हणाले. सर्वांना सुख, समृद्धी लाभो, तुम्ही आनंदाने जीवन जगा असं देखील यावेळी त्यांनी म्हंटले.
दगडूशेठ चरणी पंतप्रधान नतमस्तक
देश का सपना, विश्वगुरू बने भारत अपना… असा ‘भारत विश्वगुरु व्हावा’ याकरिता महाभिषेकाप्रसंगी प्रधान संकल्प करीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी लीन झाले. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने मंदिरात झालेल्या स्वागताने आणि ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती घेत मोदी प्रभावित झाले.