पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडुन दिले जाणारे राष्ट्रपती विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. पुण्यातील आठ पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
पुणे शहर पोलीस दलातील परिमंडळ २ पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, कोथरुड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुषमा चव्हाण, पोलीस उपअधिक्षक अनिल पाथरुडकर, लोहमार्ग चे पुणे विभागातील पोलीस उपअधिक्षक नरेंद्रकुमार गायकवाड, दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) पुणे विभाग सुनील यादव व राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपीएफ ग्रुप एक) असिस्टंट कमांडंट सादिकअली सय्यद यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहिर झाले आहेत.
सुनील यादव सध्या पुणे एटीएस येथे कार्यरत आहेत. एमपीएससी द्वारे १९८८ साली उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले.त्यांनी आपल्या ३२ वर्षांच्या कारकिर्दीत मुंबई शहर, सीआयडी, पुणे शहर गुन्हे शाखा, एसीबी, अमरावती, एटीएस मुंबई आणि पुणे येथे सेवा बजावली. त्यांना दोनशे पेक्षा जास्त पुरस्कार आणि रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळालेली आहे.
सुषमा चव्हाण या एसीबी पुणे येथे कार्यरत आहेत. १९८७ साली उपनिरीक्षक म्हणून रुजु झाल्या. त्यांनी पुणे शहर, नवी मुंबई, राज्य गुप्तवार्ता विभाग, सीआयडी, डेक्कन, लष्कर पोलीस ठाण्यात वरीष्ठ निरीक्षक म्हणून सेवा बजावली. नगर सेक्स स्कॅडल तपास केला त्यामध्ये २० आरोपीना जन्मठेप
शिक्षा सुनावली आहे. एकाच वेळी १७० घरफोडयांचे गुन्हे उघडकीस आणून बिहार एमपी मधील गुन्हेगारी टोळ्या जेरबंद केल्या होत्या. उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ४७५ पुरस्कार मिळाले आहेत.
शिरीष सरदेशपांडे हे सध्या परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. उपविभागीय अधिकारी म्हणून (वरोटा) चंद्रपूर, भुसावळ चाळीसगाव, अपर पोलीस अधीक्षक लातूर, पोलीस अधीक्षक, एसीबी पुणे, पुणे शहर मुख्यालय पोलीस उपायुक्त म्हणून सेवा बजावलेली आहे.
प्रतिभा जोशी १९९१ मध्ये उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्या. मुंबई शहर, मुंबई रेल्वे, पुणे शहरातील स्वारगेट, फरासखाना, सीआयडी, पुणे शहर अमली पदार्थ विरोधी पथक, वाहतूक शाखेत कामगिरी बजावली आहे. त्यांना ११० बक्षिसे मिळाली आहेत.
नरेंद्र गायकवाड १९८७ साली पीएसआय म्हणून निवड झाली. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक शहर, सिंधुदुग, सीआयडी, एसीबी येथे सेवा बजावली. सांगली येथील कोथळे याचा पोलीस कस्टडी मध्ये मृत्यू झाला होता त्या गुन्ह्याचा तपास गायकवाड यांनी केला.
संजय गायकवाड
देशातील सर्वात मोठा अब्दुल करीम तेलगी स्टॅम्प घोटाळा केसच्या तपास पथकात काम केले. त्यांनी केलेल्या चोरीच्या गुन्ह्यात दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केला. अमली पदार्थ विक्री करणारी आरती मिसाळ टोळीला अटक करून ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना आतपर्यंत ४८७ पुरस्कार मिळाले आहेत.