दहीहांडीचा खर्च टाळून गीता ग्रंथाचे वाटप

 पुणे- करोना संकटाच्या काळात सामाजिक भान जपत विमाननगर येथील तक्षशिला प्रतिष्ठाणच्या वतीने यंदाचा दहिहांडी उत्सव रद्द करून दहा हजार भगवद गीता ग्रंथाचे वाटप करण्यात आले. तक्षशिला प्रतिष्ठान च्या वतीने, संस्थापक नगरसेवक राहुल (आप्पा) भंडारे यांच्या संकल्पनेतून हा आगळा वेग़ळा उपक्रम राबविण्यात आला. गेली दहा वर्षे सलग विमान नगर येथे भव्य दहिहंडी उत्सव साजरा होत आहे.सामाजीक एकोपा जोपासणे व गोपाळ काला निमित्ताने भारतीय संस्कृतीचे विचार तरुण पिढीच्या मनात रुजविण्याचे काम या उत्सवातून दरवर्षी प्रतिष्ठाणच्या माध्यमातून मागील दहा वर्षांपासून करण्यात येते. यंदाच्या वर्षी जगभर कोरोना आजाराने थैमान घातले आहे.
अशा परिस्थितीत हा उत्सव सार्वजनिक ठिकाणी साजरा न करता,परंतु उत्सवात खंड पडू नये या उद्देशाने प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी होणा-या खर्चातून दहा हजार भगवदगीता ग्रंथाचे मोफत वाटप करण्यात येत आहे. उपक्रमाबाबत भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व आमदार चंद्रकांत दादा पाटील, माजी राज्यसभा खासदार संजय काकडे, यांनी राहुल भंडारे यांचे कौतुक केले. या उपक्रमाची सुरूवात भाजपचे माजी आमदार आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. तर महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, उपमहापौर सरस्वती ताई शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने , शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, यांना भगवत गीता हा पवित्र ग्रंथ देण्यात आलविजय परीहार, राजेश बागमार,डॉ . जानराव चौधरी,संदीप सिंग, पवन शर्मा,पराग येणकर,अमोल टिकेकर,दीपक चव्हाण, संतोष म्हस्के, संजय नाना गवळी यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.