नवी दिल्ली – भारताची अव्वल नेमबाज मनू भाकरने टर्कीच्या ओझगूर वर्लिकच्या साथीने प्रेसिडेंट्स चषक नेमबाजी स्पर्धेच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र गटात सुवर्णपदकाची कमाई केली.
मनू व वर्लिक जोडीने चीनच्या शिया ओ व स्पेनच्या पीटर ओलीस्क या जोडीवर 9-7 अशी मात केली. अन्य गटात भारताची नेमबाज राही सरनोबतने बंदुकीमध्ये झालेल्या बिघाडानंतरही महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात रजतपदक मिळवले. जर्मनीच्या व्हेनेकॅम्पने सुवर्ण, तर मॅथिल्डे लॅमोलेने ब्रॉंझपदक प्राप्त केले.