भारतात महागड्या स्मार्टफोनची मागणी घटली

नवी दिल्ली – भारतात करोना संसर्गाचा उद्रेक होण्यापूर्वीच त्याचा नोकरी व मोबाईल क्षेत्रावर सर्वात मोठा परिणाम होईल असा अंदाज वर्तविला जात होता आणि अंदाजानुसार असेच काही घडत आहे. भारतात प्रीमियम स्मार्टफोनची विक्री (30 हजार आणि त्यावरील श्रेणी) 32 टक्क्यांनी खाली आली आहे. जून तिमाहीच्या अहवालातून याची माहिती समोर आली आहे.

रिसर्च फर्म काउंटरप्वाइंटने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, 40 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये देशात एकाही स्मार्टफोनची विक्री झालेली नाही, तथापि लॉकडाऊन आणि करोना संसर्गाचा परिणाम प्रीमियम विभागा (सेगमेंट)वर कमी झाला आहे.

एकूण स्मार्टफोन विक्रीपैकी प्रीमियम स्मार्टफोनचा हिस्सा चार टक्के आहे. वनप्लसच्या नवीन स्मार्टफोनमध्ये वनप्लस 8 सीरिज 5 जी व्हेरिएंटची बऱ्यापैकी विक्री झाली आहे. यावेळी असेही दिसून आले की मोबाइल कंपन्या नफ्यासाठी अल्ट्रा प्रीमियम सेगमेंटवर भर देत आहेत.

या अहवालात असेही म्हटले आहे की अल्ट्रा प्रीमियम सेगमेंटमध्ये 5 जी एक प्रमुख रोल मॉडेल असल्याचे सिद्ध होईल. सॅमसंग आणि अॅपल अल्ट्रा प्रीमियम 5 जी स्मार्टफोनवर काम करत आहेत आणि लवकरच बाजारात आणले जातील. प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये वनप्लस प्रथम क्रमांकावर आहे. वनप्लसचा बाजारभाव(मार्केट शेअर) 29 टक्के आहे. या यादीमध्ये अॅपल तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतीय प्रीमियम स्मार्टफोनचे मार्केट खूपच मनोरंजक राहणार आहे, कारण शाओमी, ओप्पो आणि व्हिवोसारख्या मध्यम स्वरूपाच्या कंपन्या प्रीमियम स्मार्टफोन मार्केटमध्ये प्रवेश करीत आहेत. ज्याचे परिणाम  वनप्लस, सॅमसंग आणि अॅपल सारख्या कंपन्यांना सहन करावा लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.