मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. खूप विचार करूनच ती कोणताही प्रोजेक्ट साईन करत असते. अशा परिस्थितीत आता अभिनेत्रीने तिच्या हृदयाच्या सर्वात जवळ असलेल्या चित्रपटाचे नाव उघड केले आहे. ‘दिल चाहता है’ असे त्या चित्रपटाचे नाव आहे.
खरं तर, दिल चाहता है या चित्रपटाच्या रिलीजला नुकतीच २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात प्रीतीने शालिनीची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. आता अभिनेत्रीने चित्रपटाशी संबंधित तिच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो चित्रपटाच्या फ्लाइट सीन दरम्यानचा आहे. यामध्ये आमिर खान आणि प्रीती एकत्र सिडनीला जात आहेत. मात्र, दोघेही दोन अनोळखी व्यक्तींसारखे एकमेकांशी बोलत आहेत आणि हीच त्यांच्या चित्रपटातील मैत्रीची सुरुवात असल्याचे समजते.
हा व्हिडीओ शेअर करत प्रिती झिंटाने हा चितपट आपल्या सर्वात जवळचा चित्रपट असल्याचे म्हंटले आहे. या चित्रपटात सैफ अली खान, आमिर खान आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्याचबरोबर प्रीती झिंटा, सोनाली कुलकर्णी आणि डिंपल कपाडिया यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या.मैत्रीसह लव्हस्टोरी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता.