आरोग्यदायी इमारतींना प्राधान्य द्या (भाग-१)

दिवसभराच्या धावपळीतून आणि प्रदूषणाच्या वातावरणात राहिल्यानंतर सायंकाळी घरी आल्यानंतर मनाला शांती लाभावी आणि आरोग्यदायी वातावरण लाभावे, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. त्यामुळेच इमारतीत व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंग, घरातील खेळती हवा, स्वच्छ प्रकाश, ग्रीन गॅसचे उत्सर्जन आदींची काळजी घेतली जात आहे.

अलीकडच्या काळात मालमत्ता खरेदी करताना ग्राहक घरातील, अपार्टमेंटमधील अत्याधुनिक सोयीसुविधांवर लक्ष देतात. बिल्डरही इमारत पर्यावरणपूरक कशी राहील आणि रहिवाशांची सुरक्षा कशी जोपासली जाईल, यावर भर देत आहेत. आजच्या काळात घर खरेदी केवळ गुंतवणूक म्हणून नाही तर कुटुंब आणि घर सुरक्षित, आरोग्यवर्धक कसे राहील हा उद्देशही पाहिला जात आहे. म्हणूनच सध्या बहुतांश मंडळी पर्यावरण आणि आरोग्यदायी इमारतीत फ्लॅट खरेदी करण्याबाबत आग्रही आहेत. पूर्वी मालमत्ता केवळ राहण्यासाठीच घेतली जात होती. मात्र, आजची स्थिती बदलली आहे. दिवसभराच्या धावपळीतून आणि प्रदूषणाच्या वातावरणात राहिल्यानंतर सायंकाळी घरी आल्यानंतर मनाला शांती लाभावी आणि आरोग्यदायी वातावरण लाभावे, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. घर अशा ठिकाणी असावे की तेथे वाहनांचा गोंगाट नसावा, ध्वनी आणि वायूप्रदूषण नसावे. याशिवाय आरामापासून नवीन जीवनशैलीचा अंगीकार या गोष्टीदेखील घर खरेदी करताना पाहिल्या जात आहेत.

आरोग्यदायी इमारतींना प्राधान्य द्या (भाग-२)

आरोग्यदायी इमारतींना प्राधान्य द्या (भाग-३)

संशोधनकर्त्यांच्या मते, कोणीतीही इमारत किंवा वातावरण हे रहिवाशांच्या आरोग्यावर नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम करत असते. हवेचे वाढते प्रदूषण, ध्वनीप्रदूषण या घडामोंडीमळे पर्यावरणावर दुष्परिणाम होत आहे. पर्यायाने त्याचा परिणाम इमारतीवर देखील होताना दिसून येतो. त्यामुळेच इमारतीत व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंग, घरातील खेळती हवा, स्वच्छ प्रकाश, ग्रीन गॅसचे उत्सर्जन आदींची काळजी घेतली जात आहे.

– श्रीकांत देवळे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.