आरोग्यदायी इमारतींना प्राधान्य द्या (भाग-२)

दिवसभराच्या धावपळीतून आणि प्रदूषणाच्या वातावरणात राहिल्यानंतर सायंकाळी घरी आल्यानंतर मनाला शांती लाभावी आणि आरोग्यदायी वातावरण लाभावे, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. त्यामुळेच इमारतीत व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंग, घरातील खेळती हवा, स्वच्छ प्रकाश, ग्रीन गॅसचे उत्सर्जन आदींची काळजी घेतली जात आहे.

आरोग्यदायी इमारतींना प्राधान्य द्या (भाग-१)

पर्यावरणपूरक इमारतीचे गुण
कोणत्याही सर्वसाधारण इमारतीच्या तुलनेत पर्यावरणपूरक इमारत म्हणजेच ग्रीन बिल्डिंग ही रहिवाशांसाठी अत्यंत फायदेशीर असते. अशा इमारतीत पाणी कमी लागते, ऊर्जा वापरात सुधारणा होते आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण होते. अशा इमारतीत कचऱ्याला स्थान राहात नाही. अलीकडच्या काळात अशा इमारतींना अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी बिल्डरकडून प्राधान्य दिले जात आहे. रहिवाशांना आरोग्यवर्धक वातावरण राहील, याची खबरदारी घेतली जात आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, ऑर्गेनिक वेस्ट कंम्पोझर, सौर ऊर्जा, नैसर्गिक प्रकाश, बायोफेलिक डिझाइन यावर भर दिला जात आहे.

आरोग्यदायी इमारतींना प्राधान्य द्या (भाग-३)

बदल : अलीकडच्या काळात वेल बिल्डिंगकडे देखील ग्राहक आकर्षित होत आहेत. ही पद्धत एवढी लोकप्रिय ठरत आहे की, आता कार्यालय, घर, व्यापार संकुलातही वेल बिल्डिंग तंत्र वापरले जात आहे. इमारतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. वेल बिल्डिंग हे असे तंत्र आहे की त्यात ग्लोबल रेटिंग सिस्टिमचा वापर केला जातो. त्यात राहणाऱ्यांसाठी, काम करणाऱ्यांसाठी, शिकणाऱ्यांसाठी, खेळण्यासाठी जागेची रचना करून ते अंमलात आणण्याचे काम केले जाते. रहिवाशांचे आरोग्य चांगले राहील अशा उद्देशाने घराची रचना केली जाते. यासाठी हेल्थी इनडोअर एन्वायरमेंट अर्थात इमारतीच्या आतील भागात आरोग्यवर्धक होणे गरजेचे आहे. नागरिकांतील उत्पादकता, आरोग्य, जीवनातील प्रसन्नतेची पातळी देखील पर्यावरणपूरक घरांमुळे वाढते. परिणामस्वरुप जीवनातील अनेक स्तर हे दर्जेदार होण्यास हातभार लागतात.

– श्रीकांत देवळे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.