#लोकसभा2019 : तेज बहादूर यादव यांचा अर्ज निवडणूक आयोगाकडून रद्द

नवी दिल्ली – सैनिकांना मिळणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेवर आवाज उठवत सोशल माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या, सीमा सुरक्षा दलातील बडतर्फ जवान तेज बहादूर यादव यांना सपा-बसपा आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.

मात्र, आता समाजवादी पक्षाचे वाराणसीचे उमेदवार तेज बहादूर यादव यांचा अर्ज निवडणूक आयोगाकडून रद्द करण्यात आला आहे. त्यांनी यानंतर सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी दर्शविली असून पंतप्रधान मोदींविरोधात लढण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे.

तेज बहादूर यादव यांच्या उमेदवारीवर संकट! निवडणूक आयोगाने दिली नोटीस

पुढे बोलताना तेज बहादूर म्हणाले की,  निवडणूक आयोगाने आम्हाला मंगळवारी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत संबंधित कागदपत्रे, पुरावे देण्याचे बजावले होते. त्यानुसार आम्ही सर्व कागदपत्रे जमा केले होते. तरीही, आयोगाने माझी उमेदवारी रद्द केली असून हे चुकीचे आहे. याबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयाची लढाई लढणार असल्याचे तेज बहादूर यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/ANINewsUP/status/1123532389932830722

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)