पुणे – प्रसिद्ध गायक प्रवीणकुमार अवचर यांना सर्वोत्कृष्ट गायक व संगीत दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लायन्स क्लब इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय भंडारी, लायन द्वारकाजी जालन, लायन राजेंद्रजी गोयल, लायन राजेंद्र राठोड, यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. टीप टॉप इंटरनॅशनल हॉटेलमध्ये हा सन्मान सोहळा पार पडला.
यावेळी महाराष्ट्र राज्य व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष लायन फतेहसिंह रांका, लायन दीपक शहा लायन शाम खंडेलवाल, लायन शैलेश भाई शहा, लायन राजेंद्र गोयल, संतोष पटवा लायन रमेश शहा, यांचेसह महाराष्ट्रासह देशभरातून आलेले लायन्स क्लब इंटरनॅशनलचे सदस्य व प्रवीणकुमार यांच्या म्युझिक कलर्स ऑर्केस्ट्राचे कलाकार उपस्थित होते. पुरस्कारानिमित्त प्रवीणकुमार यांचे राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक उद्योजक क्षेत्रातील मान्यवरांकडून तसेच मित्र परिवाराकडून कौतुक केले जात आहे.
दरम्यान, गेली दहा वर्षापासून प्रवीण कुमार हे लायन्स क्लब इंटरनॅशनलसाठी त्यांच्या ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम करतात. त्यांनी लायन्स क्लबसाठी मोटिवेशनल (प्रेरणादायी) गाणी संगीतबद्ध करून गायली आहेत. बहारदार आवाज व उत्कृष्ट संगीत संयोजन असल्यामुळे ही गाणी लायन्स क्लबमध्ये प्रसिद्ध झाली. यासाठी पुणे येथील संगीत संयोजक एन .बापु व गायिका शितल यांचेही सहकार्य लाभलेले आहे. तसेच पुणे येथील उद्योगपती प्रसिद्ध कवी, गीतकार, लेखक लायन द्वारकादास जालन यांनी सुरेख पद्धतीने ही सर्व गीते लिहिलेली आहेत.