लोणावळा – ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने अयोजित केलेल्या स्पर्धेत पुण्याचा प्रथमेश गुप्ते हा “शरद श्री 2022′ या टायटलचा मानकरी ठरला. तर कोल्हापूरच्या विशाल सिन्हा याला बेस्ट पोझर व मुंबईचा रोहित मुरुडकर याला “मोस्ट इम्प्रुड बॉडी बिल्डर’ हा किताब देण्यात आला. तर महिला गटात मुंबईच्या मोनिका अगवणे हिने प्रथम क्रमांक पटकविला.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे -शरद श्री 2022 (महिला) 1) मोनिका अगवणे, मुंबई, 2) सुप्रिया इले, पुणे , 3) ग्रंथाली हांडे, मुंबई, 4) नयना खैरे, पिंपरी चिंचवड, 5) राणी शिरसाठ, पुणे, 6) सुनिला साळेकर, मुंबई शरद श्री 2022 (पुरुष) – गटनिहाय प्रथम सहा क्रमांक खालीलप्रमाणे – 55 किलो :1) दीपक कांबळे (पुणे), 2) गंगाराम राठोड (पुणे), 3) हनुमान भगत (रायगड), 4) अजय औजारकर (पिंपरी चिंचवड), 5) ललित घुले (अहमदनगर), 6) विशाल म्हात्रे (रायगड).
60 किलो : 1) गणेश पाटील (रायगड), 2) अजय भोईर (रायगड), 3) प्रतिक महाजन (रायगड), 4) सूरज शिंदे (कोल्हापूर), 5) पंढरी लोंढे (नाशिक), 6) अक्षय दांडेकर (कोल्हापूर).
65 किलो : 1) दिनेश धोंडे (पुणे), 2) बिपिन साष्ठे (पिंपरी चिंचवड), 3) गौरखनाथ भांडकोळी (ठाणे), 4) अनिश पवळे (ठाणे), 5) युनुस शेख (सोलापूर),6) प्रमोद हरणखांबे (रायगड).
70 किलो : 1) प्रथमेश गुप्ते (पुणे), 2) महेंद्र गायकवाड (रायगड), 3) किरण शिंदे (सांगली), 4) आकाश दडमल (पुणे), 5) अभिषेक पवार (मुंबई), 6) पंचाक्षरी लोणार (सोलापूर).
75 किलो : 1) रोहित मुरुडकर (मुंबई),2) सुनीत वंगेरा (पश्चिम ठाणे), 3) कौस्तुभ हाडकर (मुंबई), 4) सुभाष भद्रिके (रायगड), 5) रशिद शेख (सोलापूर), 6) मंगेश भोसले (पश्चिम ठाणे).
80 किलो : 1) विशाल सिन्हा (कोल्हापूर), 2) प्रशांत खन्नूकर (कोल्हापूर), 3) उदय ननावरे (पुणे), 4) अर्दश मेवेकरी (सांगली), 5) विनोद कागडे (पिंपरी चिंचवड), 6) अभिजित परित (पिंपरी चिंचवड). 85 किलो : 1) अमित साठम (मुंबई), 2) हरपाल राजपूत (धुळे), 3) अतुल आडाळ (पुणे), 4) आकाश वनकळस (पुणे), 5) अक्षय रोहत्रे (अहमदनगर), 6) शुभम चोरगे (पुणे).
85 किलो पेक्षा अधिक : 1) विजेंद्र ठसाळे (मुंबई), 2) संकेत काळे (पुणे), 3) चंद्रकांत तिवारी (पुणे), 4) युवराज खोत (कोल्हापूर), 5)पृथ्वी सावंत (मुंबई), 6) आकाश कवडे (कोल्हापूर).
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर व महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मोरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. तर मावळचे आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, बाळासाहेब पायगुडे, माजी उपनगराध्यक्ष भरत हारपुडे, शहराध्यक्ष विलास बडेकर आदी
उपस्थित होते.