Prakash Raj : स्पष्टवक्ते दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांच्याबाबत एक बातमी समोर आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. तामिळनाडूतील त्रिची येथील प्रणव ज्वेलर्सच्या जागेवर छापा टाकला होता. या प्रकरणी ईडी आता प्रकाश राज यांची चौकशी करणार आहे. प्रकाश राज (Prakash Raj) प्रणव ज्वेलर्ससाठी (jewellery) जाहिरात करतात.
ED summons actor Prakash Raj for questioning in ponzi scam-linked money laundering case against Trichy-based jewellery group: Officials
— Press Trust of India (@PTI_News) November 23, 2023
प्रणव ज्वेलर्सची जाहिरात प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी केली आहे. त्यामुळेच ज्वेलर्सवर छापे टाकल्यानंतर तपास यंत्रणेने आता प्रकाश राज यांना नोटीस पाठवली असून, त्यांची देखील चौकशी होणार आहे.
काय आहे नेमकं प्रकरण…
त्रिचीच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या एफआयआरनंतर ईडीने प्रणव ज्वेलर्सविरुद्ध पीएमएलए अंतर्गत गुन्हा नोंदवला. या एफआयआरमध्ये, प्रणव ज्वेलर्सने लोकांना मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे आश्वासन देऊन गोल्ड स्कीम सुमारे 100 कोटी रुपये गुंतवल्याचा आरोप आहे.
पण नंतर प्रणव ज्वेलर्सने आपल्या आश्वासनावर माघार घेत तामिळनाडूतील सर्व शोरूम रातोरात बंद केल्या. प्रणव ज्वेलर्सचे चेन्नई, इरोड, नागरकोइल, मदुराई, कुंभकोणम आणि पुद्दुचेरी सारख्या शहरांमध्ये मोठे शोरूम होते जिथे लोकांनी या सुवर्ण योजनेत एक लाख ते एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, परंतु नंतर सर्वांची फसवणूक झाली.
प्रणव ज्वेलर्सच्या लोकांनी सोने योजनेतून जनतेकडून गोळा केलेले 100 कोटी रुपये अनेक शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवले, ज्याची माहिती ईडीच्या हाती आली आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, “प्रणव ज्वेलर्स आणि त्याच्याशी संबंधित लोकांनी फसवणूक करून घेतलेले पैसे दुसऱ्या शेल कंपनीकडे वळवल्याचे तपासादरम्यान उघड झाले.
त्यानंतर प्रणव ज्वेलर्सवर छापा टाकण्यात आला. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शोध मोहिमेदरम्यान अशी अनेक कागदपत्रे सापडली ज्यामध्ये सुमारे 23 लाख 70 हजार रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांची माहिती देण्यात आली. एवढेच नाही तर ईडीने झडतीदरम्यान 11 किलो 60 ग्रॅम सोन्याचे दागिनेही जप्त केले आहेत.