लोकसभा निकालाबाबत मांडण्यात येणारे सगळे अंदाज चुकणार- प्रकाश आंबेडकर

सोलापूर: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निकालाबाबत मांडण्यात येणारे सगळे अंदाज चुकणार असून यंदा निकाल वेगळे लागतील, असा दावा केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदानानंतर आज प्रकाश आंबेडकर हे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी दौऱ्यासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते.

दुष्काळाबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, पश्‍चिम महाराष्ट्रात काही मंडळी सातत्याने पाणी पळवित असल्याने इतर जनतेच्या माथी हा दुष्काळ येत आहे. यामुळे या नेत्यांना निवडणुकीत हरवून तुमचा दुष्काळ हटवा. ब्रिटिशांनी कोकणातील नद्यांची तोंडे पश्‍चिम महाराष्ट्राकडे वळविल्याने येथे पाण्याचा उपलब्धता मोठी असली तरी नियोजनाच्या अभावामुळे सातत्याने दुष्काळाचे संकट येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.