नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू प्रग्यान ओझा याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ओझाने आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणीच्या तीनही प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले असून त्याने स्वत:च सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे.
Pragyan Ojha has retired from all forms of cricket!
He represented India in 48 matches across formats between 2008 and 2013 and picked up 144 wickets. pic.twitter.com/lQbBeC7zwW
— ICC (@ICC) February 21, 2020
३३ वर्षीय ओझाने ट्विटरवर दोन पानांचे पत्र शेअर केले आहे, ज्यात त्याने माजी कर्णधारांचे आणि सहकारी खेळाडूंचे आभार मानले आहेत. माझ्या आयुष्यातील आता पुढील टप्प्याचा प्रवास करण्याची वेळ आली आहे. प्रेम आणि समर्थन देणारा प्रत्येक व्यक्ती मला नेहमी लक्षात राहिल आणि मला ऊर्जा देत राहिल, असे त्याने म्हटले आहे.
ओझाने वर्ष २००८ मध्ये भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केले होते. त्यानंतर २०१३ मध्ये त्याने तीनही प्रकारच्या क्रिकेटमधून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने भारतीय संघाकडून २४ कसोटी, १८ एकदिवसीय आणि ६ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ११३ विकेट घेतल्या आहेत. त्यात एक वेळा दहा विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २१ तर टी-२० मध्ये १० विकेट घेतल्या आहेत.