मुंबई – प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावानेच सख्या बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली. ही धक्कादायक घटना औरंगाबादमधील लाडगाव येथे घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पळून जाऊन प्रेम विवाह केल्याने मुलाने बहिणीचं मुंडकं छाटल्यानंत आई त्या कापलेल्या डोक्यालाही शिव्या घालत असल्याचं बोललं जातं. मृत्यूच्या वेळी ती दोन महिन्यांची गरोदर होती. सगळ्याच स्तरातून या क्रूर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात असून,
आता कलाकारांनीही यावर आपलं मत मांडण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणावर मराठी अभिनेत्री मीनाक्षी राठोड हिने सुद्धा आपलं मत व्यक्त केलं आहे. सध्या मीनाक्षीची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.
काय आहे अभिनेत्रीची व्हायरल पोस्ट….
1) मोठ्या ताईचं intercaste लग्न झालं तेव्हा लोकांनी खूप त्रास दिला तुला. मी पाहिलंय. किती राग आला असेल न तुला ताई चा.
2) माझं कैलाश सोबत intercaste लग्न झालं तेव्हा लोकांनी जवळ जवळ तुला त्यांच्यात गृहीत धरणं सोडलं होतं. किती किती राग आला असेल तुला माझा! पण कायम उसाचे पाचड
अंगाखांद्यावर बाळगणारा तांडा आणि पुढारल्या पणाचे सोंग मिरवणारी आपली शहरातली कॉलनीही तुझ्या एका स्वीकाराने तुझ्या सोबत ऊभी राहीली!
3) काल परवा आपल्या लहान मुलीचं ही intercaste लग्नं मोठ्या थाटात लावून दिलस. आणि सगळ्यांनाच जणू हीच कशी नवीन जन रीत आहे हे सांगून दिलेस! हे स्विकाराचंं बीज तुला कुठे
गवसलं? आपल्याला 5 मुली असतांना सुद्धा एवढं कसं तू स्वतःला सांभाळलस.! राग कसा ग control केलास? ते ही पप्पा नसतांना, तुला नाई का ग आम्हाला मारून टाकावस वाटलं?
हे असच “कीर्ती थोरे “च्या आईला का नाई वाटलं एवढं राग अनावर होत असतो का प्रतिष्ठे पाई? तिने तर जातितच लग्न केले होते. तुझ्या एवढं नाई फक्त एकाच मुलीला स्वीकारायचं होते तिला.
पोटच्या मुलीचा इतक्या अमानुषपणे खून करावसं वाटणं या पेक्षा क्रूर काय असू शकतं या जगात. काश माझ्या सारखी आई कीर्ती ला लाभली असती तर? आणि हो!
स्वप्निल शुभम सारखे भाऊ ही! या बेगडी प्रतिष्ठेच्या बंजर जमिनीवर तुझ्या स्विकाराचंं बियाणं सापडूदे आई! काल परवाच सकारात्म वाटणारी तुझ्या वाढदिवशी लिहिलेली ही पोस्ट, आज ही घटना एकूण अस्वस्थ करणारी आहे.
सगळ्या चिंता, रुढी परंपरांना झुगारून हा जो swag तू स्वीकारला आहेस याने तुझ्या लेकरांची आयुष्य सुखी झाले आहेत. तुझ्यातल्या या सकारात्मक बदलाने आजूबाजूची परिस्थिती कुस बदलतेय! हा swag खर्या अर्थाने तुलाच शोभून दिसतो! जो प्रत्येक स्त्री मधे येवो!