पुणे : मित्रानेच वाढदिवस असल्याचे सांगत मित्रासह 22 वर्षीय तरुणीला तळजाई येथील जंगलात नेऊन त्याठिकाणी दारु पाजून बलात्कार केल्याप्रकरणात सहकारनगर अटक केलेल्या शुभम सिताराम शिंदे (वय 19, रा.धनकवडी) याची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली.
पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी पहिल्याच कारणाने पुन्हा पोलीस कोठडी मागितली जात आहे. त्याच्याकडे अधिक तपास करण्याची गरज नसल्याचा युक्तीवाद ऍड. जितेंद्र सावंत आणि ऍड. अभिजित सोलनकर यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला.
22 वर्षीय याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. जितेंद्र सावंत, ऍड. अभिजित सोलनकर, ऍड. हितेश सोनार, ऍड. अक्षय कदम आणि ऍड. अक्षय वाडकर यांनी बाजू मांडली.
शिंदे याने पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याचे सुमारास वाढदिवस असल्याचे सांगत पार्टी करण्यासाठी तळजाई शेवटचा बसस्टॉप याठिकाणी तिला बोलाविले. त्यानंतर एका मित्रासह तिघे तळजाई येथील जंगलात दारु पिण्यासाठी गेले.
त्याठिकाणी दारु पिल्यानंतर तरुणीला थंडी वाजू लागल्याने ती त्याचठिकाणी बाजूला झोपली होती. त्यावेळी आरोपी शिंदे याने तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पुढील तपास सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई करत आहे.