अरब प्रदेश मुक्त न झाल्यास इजिप्त युद्धाचा मार्ग पत्करील
जेससलेन, दि. 24 – इस्रायलचे परराष्ट्रमंत्री मोशे डायान यांनी असे जाहीर केले की, अरब प्रदेश इस्रायल जोवर सोडून देत नाही तोवर इजिप्त केव्हाही युद्धाचा पर्याय स्वीकारील, असे इजिप्तचे अध्यक्ष सादत यांनी इस्रायली नेत्यांना सांगून ठेवले आहे. डायान पुढे म्हणाले, सादत यांनी “आता युद्ध नाही’ असे शब्द वापरले, ते केवळ घोषणा म्हणून होते. परंतु इस्रायलने सादत यांना असे बजावले आहे की, शांतता करार झाल्याशिवाय इस्रायल अरबांचा व्याप्त प्रदेश सोडणार नाही.
निसर्गोपचार पद्धतीस शासनाची मान्यता
मुंबई – महाराष्ट्र निसर्गोपचार पद्धतीस एक वैद्यक पद्धती म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. आयुर्वेद युनानी व होमियोपाथिक वैद्यक पद्धतींप्रमाणेच निसर्गोपचार पद्धतीस चालना मिळेल. निसर्गोपचार वैद्यक पद्धतीस अधिकृत वैद्यक पद्धती म्हणून मान्यता देण्याचा प्रश्न गेले बरेच दिवस शासनाच्या विचाराधीन होता.
अमेरिका व व्हिएतनाम यांच्यात वाटाघाटी
वॉशिंग्टन – व्हिएतनाम व अमेरिका यांच्या दरम्यान 7 डिसेंबर रोजी पॅरिमध्ये वाटाघाटी सुरू होतील. राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याच्या हेतूने या वाटाघाटी होणार आहेत.