जुन्नर -जिल्ह्यातील वाढता करोना संसर्ग पाहता भविष्यकाळात हॉस्पिटल्समध्ये पीपीई किटची गरज लागणार असल्याने याबाबत जिल्ह्याचे सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी आवाहन केले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत लेण्याद्री देवस्थान ट्रस्टने सुमारे 2 लाख किमतीचे 164 किट पुणे येथील स्टर्लिंग हॉस्पिटल यांना देऊ केले आहेत.
यापूर्वीही देवस्थान ट्रस्टने परिसरातील मजुरांना किराणा साहित्याचे वाटप केले होते. लेण्याद्री डोंगरावरील गिरिजात्मजाच्या मंदिरात केवळ पुजारी रोजच्या धार्मिक विधींसाठी जात असून, डोंगरावरील माकडांना पाणी व खाद्य देण्याचे कामही देवस्थानच्या वतीने केले जात आहे.