विश्रांतवाडी – लोहगाव मधील मध्यवर्ती भागातील एका इमारती मधील युवकाला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे इमारती मधील 40 रहिवाशांची करोनाची चाचणी करण्यात आली आहे. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
मध्य वस्तीतील या इमारतीतील रुग्णाने लिफ्ट तसेच इतरत्र वावर केल्याच्या शक्यतेने संपूर्ण इमारती मधील 40 रहिवाशांना क्वारंटाइन केले आहे. आता त्यांचा अहवाल काय येतो यावरून लोहगावातील रुग्णांचा आकडा ठरणार आहे.