मुंबई – ऍमेझॉन प्राईम वरील लोकप्रिय आणि बहुचर्चित ‘मिर्झापूर’ या वेबसीरीजचा लवकरच दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच ‘मिर्झापूर 2’चा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
मिर्झापूरचा नवीन टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. ही सीरीज 23 ऑक्टोबर 2020 रोजी ऍमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे.
उत्तर भारतातील मिर्झापूर या भागात होणारे गुन्हे आणि गुन्हेजगतातील भयानक सत्य या सीरिजमध्ये दाखविण्यात आले. या सीझनमध्ये विजय वर्मा, प्रियांशू पैनयूली, इशा तलवार आणि Lilliput यांची एंट्री झाली आहे.
आधीच या सिनेमात पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू शर्मा, रसिका दुग्गल, विजय वर्मा, कुलभुषण खरबंदा, श्वेता त्रिपाठी, शिबा चढ्ढा अशी तगडी स्टारकास्ट असल्यामुळे आणखी कसलेले नट आल्याने मिर्झापूरच्या फॅन्समध्ये वाढ होणार हे निश्चित आहे.