हाथरस पीडितेची तुम्हाला खरंच चिंता? भाजपचा खोचक सवाल

नवी दिल्ली –  हाथरस, भदोही येथे नुकत्याच घडलेल्या बलात्काराच्या घटनांनी उत्तर प्रदेश हादरले आहे हे खरे; किंबहुना पूर्ण देशच हादरला आहे.  यातच  माध्यमांना राजकीय नेत्यांना हाथरस घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट न घेऊ दिल्यामुळे देशासह राज्यात तीव्र पडसाद उमटत होते.


त्या प्रकरणाचा आणि प्रकरणाच्या हाताळणीवरून उत्तरप्रदेश सरकारचा  निषेधार्थ देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केली जात आहे. परंतु, मुंबईतील  वसईत निषेध करण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाल्याचा प्रकार समोर आला. भाजपचे नेते रामदास कदम यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

दरम्यान  हा व्हिडियो शेअर करत  रामदास कदम यांनी  हाथरस प्रकरणावरून काँग्रेसचे नेते आंदोलनं करत आहे.  मात्र  त्यांचा खरा हेतू आता समोर आला आहे. बलात्काराची घटना ही निंदनिय आहे. पण वसईमध्ये हाथरस प्रकरणाचा निषेध करण्यासाठी जमलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. यावरून हाथरस पीडितेची खरंच तुम्हाला चिंता? असं म्हणत राम कदम यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.