Lalu Yadav Nitish Kumar Bihar Politics : राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, अंमलबजावणी संचालनालयाकडून राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांची प्रदीर्घ चौकशी सुरू असताना, राष्ट्रीय जनता दलाने एक निवेदन जारी केले आणि म्हंटले, ज्याला कोणाला कट रचायचा आहे त्याने तो रचावा. अशात जेडीयू आणि आरजेडीमध्ये आता नवीन पोस्टरवाद सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.
जेडीयू आणि आरजेडीमध्ये पोस्टरचे राजकारण
इकडे बिहारमध्ये सरकार बदलल्यानंतर पोस्टर वॉरसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आधी नितीशकुमार यांच्या पक्षाने गेल्या रविवारी पाटण्यातील रस्त्यांवर पोस्टर लावले. यानंतर मंगळवारी आरजेडी कार्यालयाबाहेर लालूंचे पोस्टर दिसले.सुरुवातीला नितीश कुमार यांचा एक फ्लेक्स चांगलाच चर्चेत आला होता. ज्यावर अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा फोटो लावण्यात आला होता.नितीश सबके है.. सब पर बीस नितीश असा आशय देखील या फ्लेक्सवर पाहायला मिळाला होता.
लालू यादव ईडी कार्यालयात हजेरी लावत असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यात एक व्यंगचित्र आहे. त्यातच काही लोक दोरी आणि क्रेनच्या साह्याने लालू यादव यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी लालूं झुकेगा नही,, असे देखील म्हणताना दाखवले आहे. पोस्टरवर युवा आरजेडीचे प्रदेश सरचिटणीस प्रेम कुमार यादव यांचे नावही लिहिले आहे.
नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भाजपाला जवळ केले. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपत घेतली. त्यामुळे बिहारमधील राजकीय वातावरण पुन्हा तापायला सुरुवात झाली आहे.