IND vs ENG 2nd Test Playing 11 : इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल होणार आहेत. दुसऱ्या कसोटीसाठी सर्फराज खान आणि रजत पाटीदार यांचे पदार्पण टीम इंडियासाठी निश्चित मानले जात आहे. याशिवाय, फलंदाजी मजबूत करण्यासाठी मोहम्मद सिराजला भारताच्या प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळेल असे वाटत नाही. रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुखापतींमुळे दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा भाग असणार नाहीत. मात्र, या दोन खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे कुलदीप यादवला दीर्घ कालावधीनंतर भारताकडून कसोटी खेळण्याची संधी मिळू शकते.
इंग्लंडविरुद्ध भारताची बॅटिंग लाइनअप खूपच कमकुवत दिसत आहे. विराट कोहली खेळत नसल्याने मधल्या फळीत एकही वरिष्ठ खेळाडू उपस्थित नाही. केएल राहुलच्या बाहेर पडल्यानंतर रजत पाटीदारचे पदार्पण निश्चित मानले जात होते. पण बॅटिंग डेप्थ कमी असल्या कारणामुळे सरफराज खानलाही पदार्पणाची संधी मिळणार आहे. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरचा फॉर्म नसणे हे या दोन खेळाडूंच्या समावेशाचे एक मोठे कारण आहे. तथापि, गिल आणि अय्यर देखील दुसऱ्या कसोटीत भारताच्या प्लेइंग 11 चा भाग असतील.
भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार बदल …
दुसऱ्या कसोटीत भारताचे गोलंदाजी आक्रमणही बदललेले दिसेल. खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त असल्याने टीम इंडिया केवळ एका वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरू शकते. जसप्रीत बुमराहला पहिल्या कसोटीत फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्टीवर 6 विकेट्स घेण्यात यश आले. अशा स्थितीत त्याचे खेळणे जवळपास निश्चित झाले आहे. याशिवाय अश्विन आणि अक्षर प्लेइंग 11 चा भाग असणार आहेत. भारताने बॅटिंग डेप्थचा जास्त विचार केला नाही तर कुलदीप यादवलाही संधी मिळेल.
अशी असू शकते प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सरफराज खान, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, केएस भरत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, आर अश्विन, कुलदीप यादव/वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह.