‘मिस्टर लेले’चे पोस्टर आऊट

मुंबई – बॉलिवूड एक्टर वरुण धवनच्या अपकमिंग चित्रपट ‘मिस्टर लेले’चे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये वरून धवन हटके अंदाजात दिसून येत आहे. पोस्टरमध्ये वरून धवन हातात बंदूक आणि कमरेला बेल्ट बांधून दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर या पोस्टरची  चांगलीच चर्चा होत आहे.


दरम्यान, सिनेमाच फक्त फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झालं असं नाही तर सिनेमाची रिलीज डेट सुद्धा रिव्हील केली आहे, आणि ती सुद्धा खुद्द निर्माता करण जोहरने एका ट्वीटद्वारे केली. या ट्वीटमध्ये फर्स्ट लूक पोस्टर शेअर करत म्हणाला, “जेव्हा तुम्हाला वाटत होतं की काय चांगली बातमी येऊ शकते तेव्हाच ती अधिक मनोरंजक होत आहे. मिस्टर लेले उर्फ वरूण धवन, शशांक खैतान एकत्र 2021ची धमाकेदार सुरुवात करणार आहेत. 1 जानेवारी 2021 रोजी होणार रिलीज.’

Leave A Reply

Your email address will not be published.