मोबाईल चोरास विरोध केल्याने तीन दात पाडून जबर मारहाण
पर्वती येथील घटना ; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
पुणे,दि. 14 -मोबाईल चोरास विरोध केल्याने एकास जबर मारहाण करुन त्याचे तीन दात पाडण्यात आले. तसेच मनगट आणी पायाचा खुबाही फ्रॅक्चर करण्यात आला. ही घटना पर्वती येथी कार्तीकस्वामी मंदिराजवळील भिंतीपाशी सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी मनोज बहुतुजे(35,रा.जनता वसाहत, पर्वती) हे पर्वती टेकडीवर कार्तीक स्वामी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्तयाच्या बाजूला असलेल्या िंभंतीवर दुपारी निवांत बसले होते. यावेळी एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याकडे चोरीच्या उद्देशाने आला. त्याने फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून त्यांना मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादीने त्यास विरोध केल्याने त्यांच्या हनुवटीवर चाकूने वार करुन खाली पाडण्यात आले. यानंतर चाकुच्या पाठीमागील बाजूने तोंडावर मारुन तोडाच्या वरील बाजूचे तीन दात पाडले. तसेच हाताने आणी लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन डाव्या हाताचे मनगट आणी डाव्या हाताच्या खुब्यात फ्रॅक्चर केले. यानंतर फिर्यादीचा सात हजाराचा मोबाईल व रोख 200 रुपये असा 7 हजार 200 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक के.डी.संकपाळ करत आहेत.