नवी दिल्ली – पोस्ट ऑफिस बचत खातेदारांसाठी महत्वाची बातमी आहे. 11 डिसेंबरपासून पीओ बचत खात्याचे नियम बदलणार आहेत. तुम्हाला हे नियम माहित असणे आवश्यक आहे. यावर्षी 11 डिसेंबरपर्यंत पोस्ट ऑफिस खात्यात किमान शुल्क ठेवणे आवश्यक आहे.
11 डिसेंबरपर्यंत तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात 500 रूपये जमा करावे लागेतील. न केल्यास खातेधारकांना देखभाल शुल्क भरावे लागेणार आहे.
बचत खातेदारांना पाठवलेल्या मेसेजमध्ये इंडिया पोस्टने म्हटले आहे की, पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात किमान शिल्लक ठेवणे आता बंधनकारक आहे. जर आपणास देखभाल शुल्क भरायचे नसेल तर ते 11 डिसेंबर 2020 पूर्वी आपल्या खात्यात 500 रुपये असणे अनिवार्य आहे.
इंडिया पोस्टच्या अधिकृत संकेतस्थळाच्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्षाच्या अखेरीस खात्यात किमान 500 रुपये न ठेवल्यास 100 रुपये देखभाल फी म्हणून वजा केली जाईल. जर खात्यात शिल्लक नसेल तर ते खाते आपोआप बंद होईल.
बचत खात्याअंतर्गत ग्राहकांना 4% दराने वार्षिक व्याज मिळते. 10,000 रुपयांपर्यंतचे व्याज पूर्णपणे करमुक्त आहे. या खात्यात किमान शिल्लक फक्त 500 रुपये ठेवणे आवश्यक आहे. बचत खाते सक्रिय ठेवण्यासाठी 3 आर्थिक वर्षात किमान एक व्यवहार करणे आवश्यक आहे.
हे खाते लहान मुलांच्या नावेही उघडले जाऊ शकते. 10 वर्षांनंतर, कोणतेही मुल स्वत: चे खाते चालवू शकतो. या जाॅईंट खातेही उघडू शकतात. एक किंवा अधिक खाती देखील उघडू शकता.
पोस्ट ऑफिस बचत खातेदारांना एटीएम, चेक, मोबाइल बँकिंग अशा अनेक सुविधा मिळतात.