पारगाव येथील हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग
पारगाव शिंगवे – शहरामधील हॉस्पिटलमध्ये रुग्णांना ज्या आरोग्य सुविधा मिळतात अशा प्रकारच्या आधुनिक पद्धतीच्या आरोग्य सुविधा आता पारगाव (ता. आंबेगाव) येथील डॉ. आशिष चव्हाण यांच्या आधार हॉस्पिटलमध्ये मिळणार आहेत. यामुळे गरीब रुग्णांना आधार हॉस्पिटल हे “आधार’ देणारे ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
पारगाव येथील आधार हॉस्पिटलमध्ये डॉ. आशिष चव्हाण यांनी चेन्नई येथील हेल्थ केअर यांच्या संयुक्त विद्यामानाने अतिदक्षता विभागाचा शुभारंभ दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार अतुल बेनके, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंग पवार, भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील,
बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक देवदत्त निकम, कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले, बाबासाहेब खालकर, बाजार समितीचे संचालक शिवाजीराव ढोबळे, शरद बॅंकेचे संचालक दौलत लोखंडे, लाला अर्बन बॅंकेचे अध्यक्ष युुुवराज बाणखिले, डॉ. राजा अमरनाथ, सरपंच बबनराव ढोबळे, गणेश यादव, डॉ. सदानंद राऊत, डॉ. सुनील खिंवसरा, डॉ. अजित वल्हवणकर,
माजी प्राचार्य बी. डी. चव्हाण, डॉ. स्मिता चव्हाण, संभाजी चव्हाण, प्रकाश चव्हाण, हरिभाऊ चव्हाण, विकास चव्हाण आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश पडवळ यांनी केले, तर शिवाजी चव्हाण यांनी आभार मानले.
शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण असते, तसे ग्रामीण भागात नसते. त्यामुळे शहरातील रुग्ण उपचारासाठी ग्रामीण भागात यावेत, यासाठी आधार हॉस्पिटल हे प्रदूषणमुक्त असणारा आहेत. हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार असून आरोग्याच्या सर्व सुविधा, तसेच तज्ज्ञ डॉक्टर उपचारासाठी उपलब्ध असणार आहेत. उपचाराचे दर कमी असणार आहेत. डायलिसिस विभागही लवकरच सुरू केला जाणार आहे.
– डॉ. आशिष चव्हाण, आधार हॉस्पिटल, पारगाव