मुंबई – अभिनेत्री पूजा भट्ट ‘बिग बॉस ओटीटी 2’ मुळे चर्चेत आली आहे. आपल्या दमदार कामगिरीने तिने ग्रँड फिनालेपर्यंत मजल मारली होती. मात्र तिला विजेतेपद जिंकता आले नाही. मात्र अनेकदा वडील महेश भट्ट आणि पुजाच्या नात्याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. नुकतेच सोशल मीडियावर एका नेटकऱ्यानं तिच्या वडीलांबाबत आक्षेपार्ह प्रश्न विचारला. यावर तिने सडेतोड उत्तर देत ट्रोल करणाऱ्याची बोलती बंद केली आहे.
पूजाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. तिच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने अभिनेत्री परवीन बाबीसोबतच्या महेश भट्ट यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांवरुन ट्रोल करण्यात आले आहे. पूजाला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, ‘अंधाऱ्या रात्री तुझ्या वडिलांच्या मागे निर्वस्त्र होऊन धावच असलेल्या परवीन बाबी यांचे किस्से सांगत आहेत. तुला खात्री आहे का की महेश भट्ट यांनी त्यांच्या अहंकारासाठी तुझ्या शरीराचा वापर केला नाही. काय विडंबना आहे देवा ही. लोक त्यांच्या अहंकार आणि पराक्रमांना संतुष्ट करण्यासाठी एखाद्याच्या निष्पाप भावनांचा वापर करू शकतात आणि मग स्वतःला देवाचे पुत्र म्हणून मोकळेपणाने फिरतात.’
त्यावर प्रत्युत्तर देत पुजा भट्ट म्हणाली, “देवाचा आशीर्वाद कायमच तुमच्या पाठीशी असुदे, तुमची या द्वेषाच्या अंधारापासून सुटका होऊ दे. तुमच्या पाठी कायमच माझ्या शुभेच्छा आहेत, तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडाव्यात अशी अपेक्षा करते.” यावेळी पूजाने अतिशय शांतपणे ट्रोलरला उत्तर दिले. सध्या तिची ही कमेंट व्हायरल होत असून अनेकांनी तिने दिलेल्या उत्तराचे कौतुक केले आहे.