नवी दिल्ली : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. अखिलेश यादव यांच्या असली हिंदुत्वच्या मुद्द्यावरून असदुद्दीन ओवैसे यांनी यादव यांना खडे बोल सुनावले आहेत. याविषयी बोलताना त्यांनी, तुम्ही संविधान आणि धर्मनिरपेक्षता वाचवणार नाही का? असा थेट सवाल ओवैसी यांनी केला आहे.
असदुद्दीन ओवैसी यांनी,’अखिलेश यादव हे म्हणत आहेत की असली हिंदुत्व वाचवलं पाहिजे. मागच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांना एक गठ्ठा मुस्लिम मतं मिळाली आहेत. ज्या व्यक्तीला एक गठ्ठा मुस्लिम मतं मिळाली आहेत तो व्यक्ती (अखिलेश यादव) म्हणतो आहे की असली हिंदुत्व वाचवलं पाहिजे. उत्तर प्रदेशच्या मुस्लिमांना तुम्ही मूर्ख का बनवत आहात? सध्या देशभरात मुस्लिमांना टार्गेट केलं जातं आहे. अशा वेळी अखिलेश यादव हिंदुत्व वाचवण्याच्या गोष्टी करत आहेत,”अशी टीका त्यांनी केली.
#WATCH अखिलेश यादव कह रहे हैं कि असली ‘हिंदुत्व’ को बचाना जरूरी है। पिछले विधानसभा चुनाव में उन्हें एकतरफा मुस्लिम वोट मिला है…भाजपा पूरे देश में मुसलमानों को निशाना बना रही है और अखिलेश कह रहे हैं कि असली ‘हिंदुत्व’ को बचाना है। आप संविधान को नहीं बचाएंगे, आप धर्मनिरपेक्षता को… pic.twitter.com/Os1eYRs25x
— ANI_HindiNews (@AHindinews) August 6, 2023
पुढे बोलताना त्यांनी,”संविधान कोण वाचवणार? सेक्युलरझिम कोण वाचवणार? त्यामुळेच आम्ही सुरुवातीपासून हेच म्हणत आहोत की अखिलेश यादव मूर्ख बनवण्याचं राजकारण करत आहेत. मुस्लिम बांधव आणि अल्पसंख्याकांना मूर्ख बनवलं जातं आहे. मुस्लिमांची दिशाभूल केली जाते आहे. उत्तर प्रदेशच्या मुस्लिमांनी ही बाब लक्षात घ्यावी आणि ढोंगी लोकांना साथ देऊ नये, “असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रविवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपावर आरोप केला. भाजपा फूट पाडण्याचे राजकारण करते आहे. अशात आपल्याला असली हिंदुत्व वाचवलं पाहिजे असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. तसेच इंडिया ही विरोधकांची नवी आघाडी फूट पाडणाऱ्या भाजपासाठी चांगला पर्याय आहे असेही अखिलेश यादव यांनी म्हटले होते. याच त्यांच्या वक्तव्याचा आधार घेऊन असदुद्दीन ओवैसी यांनी अखिलेश यादव यांच्यावर कडाडून टीका केली आहे.