नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचाराबद्दल शनिवारी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तारिक रिझवी, लिकायक आणि रियासत अशी त्यांची नावे आहेत.
तत्पूर्वी, दिल्लीच्या कोर्टाने नुकत्याच झालेल्या हिंसाचारात इंटेलिजेंस ब्युरो (आयबी)चे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या कथित हत्येप्रकरणी ‘आप’चे निलंबित नगरसेवक ताहिर हुसेन यांना सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.