उंब्रज -तारळे- पाल मार्गावर पाल गावच्या हद्दीत कमांडर जीप व दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात उंब्रज पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी दि.3 रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. या अपघाताची रात्री उशिरापर्यंत उंब्रज पोलिस ठाण्यात नोंद झाली नसल्याने अधिक माहिती समजू शकली नाही.
अजय विलास शेडगे (वय25, रा. भरतगाववाडी ता. जि. सातारा) असे अपघातातील मृत पोलीस शिपायाचे नाव आहे. अक्षय नवनाथ पवार (वय 24 रा.भरतगाववाडी) गंभीर जखमी आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, तारळे येथून उंब्रजकडे येणारी दुचाकी (एमएच 11- सीएफ- 6985) व कमांडर जीप (एमएच 14 जी 5176) यांच्यात पालच्या हद्दीतील नरसरी ओढ्याजवळ जोरदार धडक झाली. अपघातातील गंभीर जखमीवर सातारा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.