जळोची- बारामती तालुक्यातील माळेगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ लाख ७० हजार ४० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ३३ जणांवर तालुका पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून (रमाबाई नगर माळेगाव ता. बारामती ) येथे रमन गायकवाड व इतर एका बंगल्यात बेकायदा पत्त्याचा क्लब चालवुन पैशावर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकून रोख रक्कम ७ दुचाकी १ चार चाकी, गाड्या व इतर जुगाराचे साहित्य असा एकूण ९ लाख ७० हजार ४० रुपयेचा मुद्देमाल व जुगार खेळणाऱ्या ३३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पो.उ.नि. संदीप गोसावी, पो.हवा सुरेश भोई, पो.ना रमेश केकाण, आप्पा दराडे, वैभव साळवे, गणेश काटकर, राहूल लाळगे, दत्तात्रय गवळी तसेच आर.सी.पी. पथक क्रमांक ३ मधील श्रीकांत गोसावी,रज्जाक मणेरी, आबा जाधव, सचिन दरेकर, अमोल चितकुटे, सागर कोरडे, सुजीत शिंदे, प्रियंका झणझणे, मेघा इंगळे, मंगल बनसोडे यांनी केली.