पुणे । पोलीस उपनिरीक्षकावर कोयता व विटाने हल्ला

सार्वजनीक सीसीटीव्ही चोरांना पकडताना घडली घटना

पुणे – गाडीतळ पोलीस चौकीच्या हद्दीत लावलेले सीसीटीव्ही चोरणाऱ्यांना पकडण्यासाठी गेलेल्या फरासखाना पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच पथकावर वीटही फेकून मारण्यात आली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकाला अटक केली असून इतरांवर गुन्हे दाखल केले आहेत.

कुमार भागवत चव्हाण(21,रा.मंगळवार पेठ) असे अटक आरोपीचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी मंगळवार पेठेतील सार्वजनीक शौचालयाजवळ घडली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी चव्हाण याने गाडीतळ पोलीस चौकीच्या हद्दीत लावलेले सार्वजनीक सीसीटीव्ही चोरले होते. याची माहिती फरासखाना पोलिसांना मिळताच उपनिरीक्षक वाडेवाले व त्यांचे पथक त्याला अटक करण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपीने मला का पकडतोस, मी तुला जीवंत सोडत नाही असे म्हणत कोयत्याने वार केला. मात्र हा वार वाडेवाले यांनी चुकवला.

यानंतर आरोपी व त्याच्या साथीदारांनी पथकावर वीटाने हल्ला केला. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक लिंगे करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.