चाचणी रिपोर्टशिवाय मजुरांना मिळेना काम

वानवडी – वानवडीतील पालिकेच्या रोजंदारीवरील कामगारांना करोना निगेटिव्ह रिपोर्टशिवाय नाही काम मिळत नसल्याने विलासराव देशमुख क्रीडा प्रबोधनी येथे सुरू करण्यात आलेल्या चाचणी केंद्रावर रिपोर्टसाठी कामगारांची गर्दी करीत आहेत. चाचणी अहवाल असल्याशिवाय कामवार कामगारांनर येऊ दिले जात नसल्याने अशा रिपोईसाठी सर्वच जण चाचणी करू लागले आहेत.

त्यामुळे हातावर पोट असणारे कामगार करोना रॅपिड चाचणी करीत आहेत, त्यातून खासगी दवाखाने परवरडणारे नसल्याने वानवडीतील स्वॅब केंद्रावर पालिकेच्या स्वॅब केंद्रातून चाचणी करुन करण्यासाठी गर्दी होत आहे. उंड्री, पिसोळी, कोंढवा, रामटेकडी, घोरपडी, वानवडी, हडपसर येथील कामगार येथे गर्दी करीत आहेत.

याबाबत साहिल केदारी म्हणाले की, वानवडी रामटेकडी क्षेत्रिय कार्यालयाने वानवडी मधील प्रत्येक सोसायटीला महिन्यातील दोन-दोन वार देण्यात यावे यामुळे आरोग्य व वैद्यकीय विभागावर ताण येणार नाही.

केंद्राने लसी पुणे महानगरपालिकेकडे पाठवल्या आहेत. लवकरच सर्व ठिकाणी वाटप सुरू होईल. वानवडीमध्ये तपासणी साठी येणाऱ्या सर्व नागरिकांना सोयी सुविधा पुरविल्या जात आहेत. पुणे शहरात ऑक्‍सिजन बेड मिळत नसल्याने यासाठी आयुक्तांना पत्र देऊन ऑक्‍सिजन बेड वाढवण्याची मागणी करीत आहे. सावित्रीबाई शिवरकर हॉल येथे लवकरच अशी व्यवस्था सुरू करण्यात येईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.