मुंबई – लोकप्रिय गायक सोनू निगमने चेंबुरमधील एका लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांचा मुलगा स्वप्नील यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सोनू निगमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीसी विविध कलमांअंतर्गत स्वप्नील फातर्फेकर यांच्याविरोधात विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी सायंकाळी आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या माध्यमातून चेंबूर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकारानंतर प्रकाश फातर्फेकर यांच्या कन्या सुप्रदा फातर्फेकर यांनी ट्वीट करत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी ट्वीटमध्ये लिहले, “चेंबूर महोत्सवाचे आयोजक या नात्याने, मला चेंबूर महोत्सव 2023 च्या शेवटी झालेल्या घटनेबद्दल सांगायचं आहे. माझ्या भावाला सोनू निगमसोबत सेल्फी काढायचा होता. तो सेल्फी काढत असताना सोनू निगमच्या बॉडीगार्डसोबत त्याचा वाद झाला. आम्ही नंतर सोनू निगमचीही माफी मागितली. हाणामारीत एक व्यक्ती स्टेजवरून खाली पडला. आम्ही त्याला रुग्णालयात नेले आणि त्यानंतर सोनू निगम पोलिसांकडे गेला. यात राजकारण करण्यासारखे काही नाही. माझा भाऊ पोलिसांना सहकार्य करेल.