कोरेगाव भीमा – शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशाचे विसर्जन नवव्या दिवशी बुधवार (दि २७) रोजी होणार असल्याने विसर्जन मार्गाची शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व कोरेगाव भिमाचे सरपंच विक्रम गव्हाणे यांनी पाहणी केली.
कोरेगाव भीमा येथे सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. शिवजयंती, रामनवमी, दहीहंडी सारखे मोठ मोठे उत्सव अगदी निर्विघ्नपणे पार पडले. यामध्ये शिक्रापूर पोलीस स्टेशन कायम आपली कामगिरी चोखपणे बजावत असते. इतर सणांप्रमाने गणेशोत्सव देखील निर्विघ्नपणे पार पडावा.. गणेशोत्सव मार्गामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, म्हणून शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने ग्रामपंचायत पदाधिकारी व महावितरणचे कर्मचारी यांसह संपूर्ण विसर्जन मार्गाची पाहणी करून कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी प्रशासन घेत असल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय वैभव पवार, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, रज्जाक शेख, पोलीस हवलदार संदीप कारंडे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, अनिकेत गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी रतन दवणे, माजी उपसरपंच नितीन गव्हाणे, भाजपा सरचिटणीस संपत गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते नारायण ढेरंगे, अनिकेत गव्हाणे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
“गणपती विसर्जन मार्गावर कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, याची सर्व काळजी ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात येणार आहे. विसर्जनापूर्वी व विसर्जनानंतर संपूर्ण मार्गाची स्वच्छ्ता ग्रामपंचायत करणार आहे. विसर्जन काळात ग्रामपंचायत कर्मचारी व स्वयंसेवक हे पोलिसांना मदत करून गावामध्ये व पुणे-नगर रोडवर वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घेणार आहे.” – विक्रम गव्हाणे (सरपंच, कोरेगाव भीमा)
“कोरेगाव भीमा येथील गणेश विसर्जन मिरवणूक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली निर्विघ्नपणे पार पाडण्यास आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत. गणेश मंडळांनी देखील शिस्तीत मिरवणूक काढत कुठल्याही प्रकारचा वाद होणार नाही, याची काळजी घ्यावी. मंडळांनी कायद्याच्या चौकटीत राहून आपल्या बाप्पांची मिरवणूक काढावी, चुकून जर कोणी कायदा मोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.” – अविनाश थोरात (पोलीस उपनिरीक्षक)
(Police inspection of Koregaon Bhima Ganpati Visarjan Marg)