भोर – गणेश तरुण मंडळ (Ganapati Mandal) म्हटलं तर समोर उभं राहते, अमाप खर्च करून आणलेल्या सिनेकलाकार आणि सेलिब्रिटी.. यांसह आदी वाजवी उपक्रम यामुळे होणारी वादविवाद… याला अपवाद ठरत आहे.
भोर तालुक्यातील (bhor dist) वेळवंड खोऱ्यातील करंदी बु. येथील शिवराय तरुण मंडळ. या मंडळाने शालेय विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणावर स्वखर्चाने भर दिला जात आहे. यामुळे आज वेगवेगळ्या क्षेत्रात येथील तरुणाई अधिकारी व नोकरदार क्षेत्रात सेवा बजावत आहे.
अतिशय दुर्गम भागात भाटघर धरणाच्या खुशीत विसावलेल्या करंदी बुद्रुक ( ता. भोर ) येथे शिवराय तरुण मंडळाची स्थापना सुमारे ३७ वर्षापूर्वी झाली आहे. मंडळाच्या स्थापनेपासून आरोग्य शिबीर, सांस्कृतिक या विधायक कार्याबरोबरच गावातील गरजू व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना दत्तक घेतले जाते.
त्यांना प्राथमिक ते उच्च शिक्षणासाठी लागणारी आर्थिक व शैक्षणिक साहित्य पुरवले जाते. मंडळाच्या पाठबळाचे येथील तरुणांनी देखील प्रचंड मेहनत घेऊन चीज केले आहे.
गावात सध्या नामांकित बँकेचे अधिकारी, वकील, अभियंता, शिक्षक, यासह वैदकीय नोकरदार वर्ग घडू लागला आहे. यामुळे मुंबई – पुण्यात जाऊन कुल्फी विकणाऱ्या गावाची ओळख आता अधिकारी आणि नोकरदार (Servants) वर्गाची होत आहे.
शिवराय मंडळाचे अध्यक्ष अनिल सावंत यांनी माहिती देताना सांगितले कि, “सहकाऱ्याच्या संकल्पनेतून मुलांच्या शिक्षणावर भर दिला आहे. त्यांना लागणारे आर्थिक खर्च उचलला जातो. यामुळे नोकरदार वर्ग वाढू लागला आहे.
शेतकऱ्यांना शेती साहित्यसाठी व तरुणांना व्यवसायासाठी उसने स्वरुपात आर्थिक मदत केली जाते. त्यांची आर्थिक सुबत्ता वाढल्यानंतर ती रक्कम मंडळाला परत दिली जात असल्याचे कार्याध्यक्ष संदेश सावंत यांनी सांगितले.
सदाशिव सावंत, दिनकर बोडके, गोकुळ सावंत, दिलीप सावंत अजित सावंत, रमेश सावंत अनिल वाघ, अरविंद पंवार, सुभाष भावेकर, विशाल सावंत, अनिल सावंत, रुपेश बोडके, सागर सावंत, प्रविण सावंत, संतोष सावंत, अरविंद सावंत, करण सावंत, प्रणय सावंत, सुमित सावंत या सहकाऱ्याचा देखील कार्यात योगदान राहत आहे.