श्रेया शरण सध्या “सांडाकरी’ या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. “द प्रपोसल’ हा हॉलिवूडच्या सिनेमाचा हा हिंदी रिमेक असणार आहे. या शुटिंगदरम्यान श्रेया शरणला एका वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागले होते. “सांडाकरी’ शुटिंगची सगळी टीम लंडनमध्ये विमानतळाच्या परिसरात एक महत्वाचे शुटिंग करत होती.
त्यावेळी श्रेया शरण विमानतळाच्या अतिशय संवेदनशील आणि संरक्षण दृष्ट्या महत्वाच्या भागामध्ये घुसली. तिला तिथे घुसलेले बघताच सुरक्षेवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला हटकले. एवढेच नव्हे, तर तिला चक्क घेरले आणि उचलून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. तिथे तिची कसून चौकशी करायला सुरूवात झाली.
या संवेदनशील भागामध्ये कशी आली ? त्यावेळी आवश्ज्यक परवानगीचे पत्र बरोबर का नव्हते ? असे प्रश्न करून पोलिसांनी तिला भंडावून सोडले. तेवढ्यात तिच्याबरोबर काम करणारा स्टार वेमल तिथे आल्यावर सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. पण पोलिसांचा अरोप गंभीर असल्ल्यआमुळे वेमलने आपल्या टीमला सगळी कागदपत्रे घेऊन बोलावले. कागदपत्रे बघितल्यावर श्रेयाला जाऊ देण्याची परवानगी दिली गेली. श्रेयानेही आपल्या चुकीबद्दल माफी मागितली आणि प्रकरण मिटले.