उत्तर प्रदेशातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 17 वर्षीय तरुणीवर तब्बल 28 जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याहूनही धक्कादायक बाब अशी की या अत्याचारमध्ये मुलीचे वडिलांसाहीत समाजवादी आणि बहुजन समाज पक्षाच्या जिल्हा प्रमुखांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांपासून मुलीवर लैंगिक अत्याचार होत होते.
या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. ललितपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी 28 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तीन अज्ञात आहेत. आरोपींमध्ये वडील, राजकीय नेत्यासोबत नातेवाईक आणि काही स्थानिक नागरिकांचा समावेश आहे.पोलिसांनी मुलीची वैद्यकीय चाचणी केली आहे. तसंच दंडाधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
आम्ही आतापर्यंत सात लोकांना अटक केली असून यामध्ये मुलीचे वडील आणि समाजवादी पक्ष तसंच बहुजन समाज पक्षाच्या जिल्हा प्रमुखांचा समावेश आहे. पीडित मुलीच्या आईने आपला पती 10 वर्षाच्या मुलावरही लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी पीडित मुलगी आणि कुटुंबाला सुरक्षा दिली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
ललितपूर पोलीस ठाण्यात पीडित मुलगी व तिच्या आईने आरोप केले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून आपल्यावर सामूहिक बलात्कार केला जात असल्याचा आरोप केला. जेव्हा आपण सहावीत होतो तेव्हा वडिलांनी जबरदस्ती पॉर्न व्हिडीओ दाखवत आपल्यावर बलात्कार केल्याचं मुलीने पोलिसांना सांगितले आहे.
यानंतर आरोपी पित्याने मुलीला शहरातील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये घेऊन गेला, जिथं तिच्यावर लोकांनी बलात्कार केला. वडिलांनी धमकावले असल्याने मुलीने कुठेही वाच्यता केली नव्हती. यानंतर मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला.