इन्स्टाग्रामद्वारे ओळख वाढवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला पोलीस कोठडी

पुणे (प्रभात वृत्तसेवा) – इन्स्टाग्रामद्वारे ओळख वाढवून लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर सहा महिन्याहून अधिक काळ बलात्कार केल्याप्रकरणी 21 वर्षीय तरूणाला अलंकार पोलिसांनी अटक केली.

त्याला 19 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालायने दिला आहे.
रोहन दिलीप पोवार (रा. राजगुरूनगर) असे त्याचे नाव आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. वाजेद खान आणि ऍड. आरीफ खान (बिडकर) यांनी काम पाहिले. डिसेंबर 2020 ते आतापर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला. 

इन्स्टाग्रामवर चॅटींगद्वारे दोघांची ओळख झाली. त्यानंतर त्याने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.