डेल्टा प्लस विषाणूबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच डॉ. पॉल यांची ‘दिलासा’दायक माहिती; म्हणाले…

नवी दिल्ली – उत्पपरिवर्तित डेल्टा प्लस या विषाणूची अद्याप चिंतेची बाब म्हणून वर्गवारी केली नसल्याकडे, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य), डॉ. व्ही. के. पॉल यांनी जनतेचे लक्ष वेधले आहे. करोना विषाणूचे नवे रूप समोर आल्याची जनतेमध्ये चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. 

विषाणूचे नवे रूप सापडले आहे ही सद्यपरिस्थिती आहे. सध्या हा विषाणू व्हेरीयंट ऑफ इंटरेस्ट असून व्हेरीयंट ऑफ कन्सर्न या चिंतेच्या वर्गवारीत याचा समावेश नसल्याचे त्यांनी सांगितले. व्हेरीयंट ऑफ कन्सर्न म्हणजे वाढते संक्रमण किंवा धोकादायक असल्यामुळे मानवतेवर प्रतिकूल परिणाम करणारा विषाणू प्रकार असे समजले जाते. 

यासंदर्भात सध्याच्या घडीला तरी डेल्टा प्लसबाबत आपल्याला माहिती नाही, असे डॉ. पॉल म्हणाले. नवी दिल्लीत कोविड-19 संदर्भात प्रसारमाध्यमांना आधीच्या आठवड्यात माहिती देताना ते बोलत होते.

देशात याच्या संभाव्य अस्तित्वाबाबत लक्ष, ठेवून सार्वजनिक आरोग्यासंदर्भात योग्य ती पावले उचलणे हा मार्ग आहे. डेल्टा प्लस या बदलाबाबत आपल्याला नजर ठेवण्याची, या प्रकारावर शास्त्रीय पद्धतीने लक्ष ठेवण्याची गरज असून हा आपल्या देशाबाहेर आढळला आहे.

आपल्या देशात याचे संभाव्य अस्तित्व आणि वाढ याचा शोध घेण्यासाठी, इंडियन डकॉन्सोर्टियम ऑन जिनोमिक्‍सद्वारे यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. विषाणूसंदर्भात हा पुढचा मार्ग आहे. आपल्या सुमारे 28 प्रयोगशाळांच्या सर्वसमावेशक प्रणालीच्या भविष्यातल्या कार्यासाठीचा हा महत्त्वाचा भाग असेल असेही त्यांनी सांगितले.

भविष्यात हे विषाणू उद्‌भवणार नाहीत याची खातरजमा करण्यासाठी कोणतेही अचूक हत्यार किंवा त्यांना दूर ठेवण्यासाठी मार्ग नाही याचे स्मरण आपल्याला ठेवायला हवे. त्यांच्यावर लक्ष ठेवून त्याबाबत जाणून योग्य तो प्रतिसाद आणि आपल्यावर त्याचा परिणाम याबाबत सावध राहण्याची गरज आहे.

कोविडला प्रतिबंध करणारे वर्तन करूनच संक्रमणाची साखळी खंडित करू शकलो तर विषाणूचा कोणताही प्रकार असला तरी त्याचा प्रसार रोखणे शक्‍य होईल. दुसऱ्या लाटेत डेल्टा बी.1.617.2 या प्रकारच्या विषाणूने आपला प्रभाव दर्शवला, अतिशय लवकर संसर्ग या त्याच्या गुणधर्मामुळे ती लाट तीव्र होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. 

त्याच धर्तीवर डेल्टा प्लस हे अतिरिक्त उत्परिवर्तन आढळले आहे. मार्चमध्ये हा युरोपमध्ये आढळला आणि त्याची दखल घेण्यात आली आणि केवळ दोन दिवसापूर्वी 13 जूनला त्याविषयी सार्वजनिकरीत्या माहिती दिली गेली..

उत्परिवर्तन ओळखता येणे महत्त्वाचे

एमआरएनए विषाणूच्या प्रतिकृतीतल्या बदलांमुळे त्यांच्यातील उत्परिवर्तन अगोदर ओळखता आले. याबाबत हे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या आरएनएमध्ये प्रतिकृतीत त्रुटी येतात तेव्हा विषाणूला काही प्रमाणात नवे वैशिष्ट्य प्राप्त होते.

रोगाच्या दृष्टिकोनातून ते अतिशय महत्त्वाचे असू शकते, जिथून विषाणू शरीराच्या पेशीशी जोडला त्या स्पाईक प्रोटीन सारख्या बाबतीत ते असू शकते. हा भाग जर आधीच्या रूपापेक्षा जास्त प्रभावी असेल तर तो नुकसानकारक ठरतो. म्हणूनच विषाणूच्या या रूपाबाबत आम्ही चिंतीत आहोत, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.