चेन्नई – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी महाबलीपुरममध्ये पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांची भेट झाली. यावेळी पंचरथ या ठिकाणची पौराणिक माहिती मोदींनी जिनपिंग यांना दिली. मोदींनी जिनपिंग यांना 2 खास भेटवस्तू दिल्या आहेत.
मोदींनी जिनपिंग यांना एक तंजावूर शैलीतील सरस्वतीचे नृत्यू करणारे खास पेंटिंग दिले आहे. हे पेंटिंग अत्यंत पवित्र समजले जाते. याचबरोबर मोदींनी 12 कलाकारांनी 12 दिवसांमध्ये तयार केलेला एक ‘अन्नम खास दिवा’ जिनपिंग यांना भेट केला आहे. या दोन्ही भेटवस्तू अतिशय सुंदर आहेत. अन्नम दिवा शुद्ध तांब्याचा असून त्यावर सोन्याचा वर्ख आहे. या दिव्याचे वजन 108 किलो आहे.