Rashid Khan has withdrawn from the upcoming Big Bash League season 13 :- अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. भारताने आयोजित केलेल्या एकदिवसीय विश्वचषक-2023 मध्ये खेळलेल्या राशिद खानचा एक फोटो गुरुवारी हॉस्पिटलमधून समोर आला. स्वतः रशीदनेही हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला, ज्यावर चाहते सतत कमेंट करत आहेत.
राशिद खानने इंस्टाग्राम अन् ट्विटर (X)वर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो बेडवर पडलेला दिसत आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, तुमच्या सर्व प्रार्थनांसाठी खूप खूप धन्यवाद. शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली आणि आता बरे होण्याचा मार्ग सुरू होईल. मी मैदानात परतण्यासाठी उत्सुक आहे. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत तो लवकर मैदानात यावा यासाठी प्रार्थनाही केली आहे.
Thank you everyone for your well wishes 🙏
The surgery went well, now on the road to recovery 💪
Can’t wait to be back on the field 💙 pic.twitter.com/zxLYKFaoYE— Rashid Khan (@rashidkhan_19) November 23, 2023
ऑस्ट्रेलियातील बिगबॅश टी-20 लीगमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज बनलेल्या अफगाणिस्तानच्या रशीद खानला या स्पर्धेला मुकावे लागणार आहे. भारतात नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेदरम्यान त्याला पाठीच्या दुखापतीने सातत्याने सतावले होते.
त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे निदान वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आणि त्यानंतर त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. खुद राशिद खानने याबाबत माहिती दिली आहे. आता त्याच्या जागी कोणता खेळाडू निवडला जाणार ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्धची मालिका रद्द केल्याने रशीद खान याने नाराजी व्यक्त केली होती.