Kangana Ranaut : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल स्वदेशी ‘तेजस’ लढाऊ विमानातून गगनभरारी घेतली. यावेळी पंतप्रधान बेंगळुरूमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या साइटवर पोहोचले. तेथे त्यांनी स्वदेशी ‘तेजस’ जेट आणि त्याच्या निर्मिती सुविधेचा आढावा घेतला. तेजस हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने ते बनवले आहे. या सोबतच त्यांनी तेजस विमानामध्ये भरारी देखील घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तेजस या लढाऊ विमानातून भरारी घेतल्यानंतरचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यावेळी पंतप्रधानांनी आपला अनुभव शेअर करण्यासाठी ट्विट केले आहे. “तेजसमधून यशस्वीपणे उड्डाण पूर्ण केले. हा अनुभव समृद्ध करणारा होता, आपल्या देशाच्या स्वदेशी क्षमतांवरील माझा आत्मविश्वास वाढवणारा होता. तसेच या अनुभवामुळे मला आपल्या राष्ट्रीय क्षमतेबद्दल अभिमान आणि आशावादाची भावना निर्माण झाली.” असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
We hope honourable Prime Minister @narendramodi ji saw our film #Tejas dedicated to made in Bharat fighter jet Tejas and our Indian Air Force. Those of you who missed it in the theatres, soon it will be available on @ZEE5India and @SonyLIV
Jai Hind 🇮🇳 https://t.co/yE0m3fqMO2— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 25, 2023
पंतप्रधानांचे हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. आता कंगनाने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे फोटो शेअर केले आहे. या फोटोसोबत कंगनाने तिच्या ‘तेजस’ या चित्रपटाबद्दलही चाहत्यांना माहिती दिली आहे. कंगना आपल्या पोस्टमध्ये लिहिते की, ‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी आमच्या सैनिकांना समर्पित आहे. भारत फायटर प्लेन तेजसवर बनवलेला आमचा तेजस चित्रपट पाहिला असेल अशी आशा आहे. तुमच्यापैकी ज्यांनी हा सिनेमा चित्रपटगृहात पाहिला नसेल त्यांना तो लवकरच @zee5 आणि @sonylivindia वर दिसणार आहे.’
दरम्यान, कंगनाचा तेजस हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कंगनाने भारतीय वायुसेनेच्या पायलटची भूमिका केली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. या चित्रपटाने केवळ 5.15 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास झाला आहे.