नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शनिवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. येत्या 14 एप्रिल रोजी लॉकडाऊनची मुदत संपत आहे पण अजून देशातील करोना आटोक्यात आलेला नाही.
या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची मुदत वाढवायची किंवा कसे या बाबत ते राज्यांची मते जाणून घेणार आहेत. पंतप्रधानांनी नुकतीच सर्व प्रमुख राजकीय नेत्यांशी या अनुषंगाने चर्चा केली आहे. त्यावेळी त्यांनी सर्व देशातील लॉकडाऊन एकाचवेळी उठवला जाण्याची शक्यता नाही असे संकेत दिले आहेत. अनेक राज्यांनी आणि तज्ज्ञांनी लॉकडाऊनची मुदत वाढवण्याची सूचना केली आहे. ओडिशा राज्याने या आधीच लॉकडाऊनची मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवली आहे.