ऑक्टोबरमध्ये स्पर्धा खेळविण्याचे समर्थन
नवी दिल्ली – करोनाच्या धोक्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा होणार का याबाबत संभ्रम निर्माण झाल्यानंतर अनेकांनी ही स्पर्धा आणखी पुढे ढकलुन करोनाचा प्रभाव कमी झाल्यावर खेळविण्यात यावी यासाठी गेल्या दिवसांपासून अट्टहास सुरु केला आहे. आता त्यातच माजी कसोटीपटू गोलंदाज आशिष नेहरा यानेही समर्थन दिले आहे.
एकीकडे करोनाची भारतातील व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून हा धोका पूर्णपणे संपुष्टात येत नाही तोपर्यंत कोणत्याही स्पर्धा होऊ नयेत अशी भूमीका विविध क्रीडा प्रकारांच्या संघटनांनी घेतली आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ तसेच विविध संघांचे मालक व आजी माजी खेळाडू ही स्पर्धा व्हावी याचा अट्टहास करत आहेत. नेहरानेही ही स्पर्धा ऑक्टोबरमध्ये ही स्पर्धा घेण्याच्या अनेकांच्या मागणीचे समर्थन केले आहे. सध्या करोनाचा धोका असला तरी येत्या काही काळात आपण त्यावर निश्चितच मात करण्यात यशस्वी होऊ.
त्यावेळी ऑक्टोबरमध्ये ही स्पर्धा होऊ शकते. केवळ स्पर्धा रद्द करा अशी मागणी करणे योग्य नाही. त्यात जसे मंडळाचा, संघ मालकांचा व खेळाडूंचा आर्थिक तोटा होण्याचा धोका आहे तसाच स्पर्धेसाठी राबणारे रोजंदारीवरील लोकांनाही तोटा हेणार आहे. अनेकांचे रोजगार या स्पर्धेवर अवलंबुन आहेत याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे, असेही नेहराने व्यक्त केले.