कारगिल – पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील कारगिलमध्ये पोहोचले आहेत. लष्कराच्या जवानांसोबत ते येथे दिवाळी साजरी करत आहे.
Prime Minister Shri @narendramodi has landed in Kargil, where he will celebrate Diwali with our brave soldiers. pic.twitter.com/RQxanDEgDK
— PMO India (@PMOIndia) October 24, 2022
पंतप्रधान गेल्या आठ वर्षांपासून लष्करातील जवानांसोबत दीपावलीचा सण साजरा करत आहेत. नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ते नेहमीच सैनिकांसोबत दिवाळीचा सण साजरा करतात.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम ठेवत जम्मू-काश्मीरमधील कारगिल द्रास येथे पोहोचले. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी लष्करातील जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. या वर्षी सलग 9व्यांदा पंतप्रधान लष्कराच्या जवानांमध्ये पोहोचले आहेत आणि दिवाळीचा आनंद शेअर करणार आहेत.
मोदींना तेथे उपस्थित पाहून लष्करातील जवानांच्या आनंदाला सीमा नाही. यावेळी मोदींनी उपस्थित सैनिकांशी संवाद साधला आणि त्यांची अवस्था जाणून घेतली. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी सीमेवरील विविध भागात लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली.