Arvind Kejriwal । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पालकांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी लिहिले आहे की, ‘मी माझ्याआई-वडील आणि पत्नीसह दिल्ली पोलिसांची वाट पाहतोय, पण ते येईल की नाही हे त्यांनी (पोलिसांनी) सांगितलेले नाही.’
अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मी माझ्या आई-वडील आणि पत्नीसह पोलिसांची वाट पाहतोय. काल पोलिसांनी फोन करून माझ्या पालकांची चौकशी करण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र ते येणार की नाही याबाबत त्यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.’
दरम्यान, दिल्ली पोलिसांचे एक पथक आज 11.30 वाजता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पालकांची चौकशी करणार होते. ही केजरीवाल यांच्या पालकांनी दिली होती, मात्र नियोजित वेळेच्या काही वेळापूर्वी दिल्ली पोलिसांनी आज एक निवेदन जारी करून चौकशी करण्यास नकार दिला. मात्र, त्यांचे पथक केजरीवाल यांच्या पालकांची चौकशी कधी करणार आणि आज वेळ देऊनही त्यांची चौकशी का झाली नाही, हे पोलिसांनी सांगितलेले नाही.
घटनेच्या वेळी आई-वडील घरीच होते.
स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी ही चौकशी होणार आहे. ही घटना घडली तेव्हा सीएम केजरीवाल यांचे आई-वडील घरी उपस्थित होते, असे चौकशीमागील कारण सांगितले जात आहे. पोलिसांना या प्रकरणी घरात उपस्थित सर्व लोकांचे जबाब नोंदवायचे आहे. सीएम केजरीवाल यांनी एक दिवस आधी दावा केला होता की दिल्ली पोलीस आता त्यांच्या पालकांची चौकशी करतील. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट लिहिताना, ‘दिल्ली पोलिस माझ्या वृद्ध आणि आजारी पालकांची चौकशी करण्यासाठी येतील’, असे म्हटले होते.
वादानंतर मारहाण केल्याचा आरोप
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती मालीवाल यांनी मॅजिस्ट्रेटसमोर दिलेल्या जबाबात सांगितले आहे की, 13 मे रोजी जेव्हा ती सीएम हाऊसमध्ये गेली तेव्हा अरविंद केजरीवाल यांचे आई आणि वडील आणि सुनीता केजरीवाल नाश्ता करत होते. स्वातीने तिघांनाही सकाळच्या शुभेच्छा दिल्या आणि नंतर डायनिंग हॉलमध्ये आली, जिथे वाद झाल्यानंतर तिला मारहाण करण्यात आली. आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी सीएम केजरीवाल यांचे पीए विभव कुमार सध्या 5 दिवसांच्या पोलिस कोठडीत आहेत.
हे वाचले का ? तब्बल 395 डॉलरला एक अननस